मुजफ्फरनगर : ऊस विभागातील अधिकाऱ्यांनी संधावली आणि नावला येथे गळीत हंगाम २०२२-२३ साठी ऊस सर्वेक्षम केले. शेतकऱ्यांना ऊस पिकाचा किडीपासून संरक्षण कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी यांच्यासोबत ऊस विकास परिषद तितावी आणि ऊस विकास परिषद मन्सूरपूरच्या पथकांनी शेतांना भेटी दिल्या. ऊस संशोधन केंद्राचे प्लांट पॅथॉलॉजिस्ट डॉ. अवधेश डांगर, कीटक तज्ज्ञ डॉ. निलम कुरील, मन्सूरपूर कारखान्याचे महाव्यवस्थापक बलधारी सिंह आदींनी ऊस पिकावरील विविध किड, रोगांविषयी माहिती दिली आणि पाहणी केली. संशोधकांनी शेतकऱ्यांना सांगितले की, ऊसावरील टॉप बोरर किडीच्या नियंत्रणासाठी कोरोजन औषधाचा वापर करावा. ऊस पिकावर काही ठिकाणी किडीने प्रभावीत झालेली पाने, रोपे दिसतात. अशी रोगट रोपे काळजीपूर्वक उखडून टाकावीत. आणि ती जाळून नष्ट करावीत. मन्सूरपूर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अरविंद कुमार दीक्षित यांनी सांगितले की, कारखान्याकडून १५ टक्के सवलतीच्या दराने कोरोजन शेतकऱ्यांना दिले गेले.