उस लागवडीकडे शेतकऱ्यांची झाली रुची कमी: क्षेत्र घटणार

उस्मानाबाद : सततचा दुष्काळ आणि खालावलेल्या पाणी पातळीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र कमी होताना दिसत आहे. गतवर्षी प्रमाणे यंदाही पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी उस लागवड करणार नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात पाऊस चांगला झाल्यास ऊस क्षेत्र वाढते. गेल्यावर्षी ते वाढले होते. पण त्यानंतर पावसाने दिलेली हुलकावणी साखर उद्योगाला अडचणीत आणणारी ठरली आहे. याचा फटका ऊस उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे.

गेल्यावर्षी जवळपास 50 हेक्टरवर ऊसाची लागवड झाली होती. हंगाम सुरु झाल्यानंतर पाण्याची उपलब्धता नसल्यान शेतकर्‍यांना ऊस लवकर घालण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. या सर्वच कारणांमुळे ऊसाच्या क्षेत्रात निम्म्याहून अधिक क्षेत्रात घट झाल्याचे दिसून येत आहे. यंदा ऊसाचे क्षेत्र 20 हजार हेक्टरच्या जवळपास राहिल्याचे दिसून येत आहे. अजूनही यामध्ये घट होईल असे तज्ञांचे मत असून पुढील वर्षी कारखान्यांना शेतकर्‍यांच्या मागे लागण्याची वेळ येईल असे चित्र आहे. ज्या शेतकर्‍यांना पाण्याची सोय आहे, अशा शेतकर्‍यांकडेच आता ऊसाचे पीक दिसणार असून इतर लोकांना मात्र अन्य पिकांकडे वळावे लागणार आहे. कारखान्यांनाही अनेक अडचणींना सामेारे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here