कोल्हापूर, दि. 19 जुलै 2018: उसाच्या एफआरपीमध्ये (उचित आणि लाभकारी मूल्य) केंद्र सरकारने प्रतिटन 200 रुपयांची वाढ केली आहे.2018-19च्या गाळप हंगामासाठी उसाला
प्रतिटन 2750 रुपये दर एफआरपी असेल. अर्थातच, त्यासाठी 9.5 टक्के असणारा उताऱ्याचा निकष 10 टक्के करण्यात आला आहे. तरसाडेनऊ टक्के आणि त्यापेक्षा कमी उतारा असल्यास 2610 रुपये प्रतिटन दर मिळेल. साखर उद्योगासाठी गेल्या काही आठवड्यांत सरकार तर्फे जाहीर करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय काल घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय कायदामंत्री रविशंकर यांनी वाढीचा निर्णय शेतकऱ्यांनी हिताचा असल्याचा दावा केला. केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट एमएसपी देण्याच्या मालिके पैकी एक आहे, अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी स्वागत केले. गाळप हंगाम 2018- 19 ऑक्टोबरपासून सुरू होईल 2017- 18 च्या हंगामात प्रति प्रतिटन 2550 रुपये एफ आर पी होता. नवीन हंगामासाठी एफ आर पी 2750 रुपये असेल. यामध्ये उसाचा उत्पादन खर्च 1550 रुपये पकडला आहे सुधारित एफआरपी ची रक्कम 77 .45 टक्क्यांनी वाढ आहे या निर्णयामुळे हजारो कोटी रुपये मिळतील, असे सरकारचे म्हणणे आहे. देशातील 295 साखर कारखान्यांचा सरासरी उतारा 10 टक्क्यांहून अधिक असल्यामुळे या दरात साडेनऊ टक्क्यांवरून 10 टक्के अशी सुधारणा केली आहे. उतारा 10 टक्क्याहून अधिक असेल तर अधिक प्रत्येक 0.1 टक्का उतार यासाठी क्विंटल मागे 2. 75 लाभांशही मिळेल परंतु साडेनऊ टक्क्यांपेक्षा कमी उतारा असल्यास मध्ये कपात करण्यात आली आहे.