साखर निर्यात कोटा वाढवावा : उस दराची परिस्थिती बिकट
कोल्हापूर, दि. 23 जून 2018: देशांतर्गत साखरेचा तत्काळ उठाव होण्यासाठी साखर परवडली, नाही परवडली तरीही साखर निर्यात वाढविल्याशिवाय साखेचे संकट टळणार नाही. त्यामुळे, सध्या असणाऱ्या साखर टनामध्ये दुपटीने म्हणजेच 80 लाख टनाने निर्यात कोटा वाढवावा लागणार आहे. तसेच, देशात थकीत 18 हजार कोटींची एफआरपी थकीत आहे. ही एफआरपी देण्यासाठी किमान प्रतिटन 100 रुपये अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी साखर कारखान्यांसह राष्ट्रीय सहकारी महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास शेतकऱ्यांची देणे देण्यास मदत होणार आहे.
देशात साखर उत्पादन वाढले आहे हे सर्वश्रुत आहे. आता साखर वाढली, दर कासळले असे म्हणत बसण्याऐवजी यावर तोडगा काढण्याचे काम केले जात आहे. साखर निर्यातीत वाढ झाल्यास देशांतर्गत बाजारपेठीतील साखरेचे दर वाढून कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना काही पैसे मिळू शकतील. केंद्र सरकारने पॅकेज जाहीर केल्यांनतरही साखर दराची घसरण सुरूच आहे. ही मोठी चिंतेची बाब आहे.
केंद्राने नुकतेच 4047 कोटी रुपयांचे इथेनॉलचा सध्याचा दर 40.45 रुपये आहे. यात वाढ झाल्यास साखर कारखान्यांना काही पैसे मिळणार आहेत. याचा विचार करून ज्या प्रमाणे पॅकेज जाहीर केले त्याचनूसार दरात ही वाढ करणे अपेक्षीत असल्याचे वळसे-पाटील यांनी नमूद केले आहे. साखर उद्योगाला स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी निर्यात कोटा आणि इथेनॉलला प्रतिलिटरचा दर वाढविण्याशिवाय पर्याय नाही. शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि त्याला मिळणारा दर यामध्येही मोठी तफावत होत चालली आहे. याचा वेळेत विचार झाला पाहिजे, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.