दहा कोटींच्या थकबाकीबाबत ऊस उत्पादकांची निदर्शने

विरुधूनगर : धरणी शुगर्सने शेतकऱ्यांचे थकीत १० कोटी रुपये द्यावेत या मागणीसाठी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या तक्रार निवारण बैठकीला शेतकरी अर्धनग्न अवस्थेत आले. कारखान्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले.

तामीळनाडू विवासयगल संगम संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन. ए. रामचंद्र राजा यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून कारखान्याने आमचा एक पैसाही दिलेला नाही. आता कारखाना बंद करण्यात आला आहे.

याबाबत द हिंदू डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ते म्हणाले, शेतकऱ्यांमध्ये स्वतःची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी जे. मेघनाथ रेड्डी यांनी शेतकऱ्यांना थकबाकी मिळवून देण्यासाठी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यादरम्यान, शेतकऱ्यांनी सांगितले की, विरुधूनगर जिल्ह्यात सुमारे १०,००० एकर क्षेत्रात उसाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा ऊस इतर साखर कारखान्याला नेण्याबाबतची कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. रामचंद्र राजा यांनी सांगितले की, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना ऊस इतर कोणत्याही कारखान्याला पाठवला जावा अशी मागणी केली आहे. जे कारखाने तत्काळ ऊस बिले देतील त्यांना आमचा ऊस पाठवावा अशी आमची मागणी आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here