बदायूं : शेखूपुर येथील दि किसान सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकीत पैसे देण्यास सुरुवात केली आहे. कारखान्याने १८ कोटी रुपये ऊस समितीला दिले आहेत. कारखान्याच्या सर व्यवस्थापाकांनी सांगितले की, हे पैसे लवकरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा कले जातील.
किसान सहकारी साखर कारखाना शेखुपूरने गाळप हंगाम २०२०-२१ मधील थकीत २,८३३.४४ लाख रुपयांपैकी शासनाकडून आर्थिक मदतीच्या रुपात १८ कोटी रुपये मिळाले आहेत. ऊस समित्यांना हे पैसे पाठविण्यात आले आहेत. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक आर. के. रस्तोगी यांनी सांगितले की, कारखान्याला जी रक्कम मिळाली आहे, ती समितीला दिले आहेत. तेथून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे दिले जातील. हंगाम २०२०-२१ मध्ये कारखाना समितीकडून सुमारे ७७ टक्के ऊस बिले देण्यात आले आहेत.