मुरादाबाद(उत्तर प्रदेश) : ब्राझील प्रमाणे भारतातही आता मोठ्या प्रमाणावर मशीन च्या सहाय्याने ऊस तोडणी केली जात आहे. पूर्वी पंजाब आणि महाराष्ट्रात ऊस मशीन च्या साहाय्याने तोडला जात होता पण आता संभल मध्ये देखील मशीन वापरून ऊस तोडला जात आहे. मजूरी पेक्षाही मशीन वापरुन केलेल्या ऊस तोडणीचे मल्य स्वस्त असल्यामुळे शेतकरी या पध्दतीचा अवलंब करीत आहेत. मशीन वर ऊस तोडणी 38 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे केली जाते, तर मजूरी 45 रुपये प्रति क्विंटल इतकी आहे.
संभलमध्ये गेल्या वर्षी प्रायोगिक पध्दतीने हॉलंड च्या मशीनने ऊस तोडण्यात आला होता, पण जेव्हा शेतकऱ्यांनी उत्साह दाखवला तेव्हा संभल जिल्ह्यातील असमोली क्षेत्रातील शेतकऱ्याने 1.20 करोड़ प्रमाणे हे मशीन खरेदी केले. विदेशी कंपनीने या मशीन ला पुण्यातील आपल्या प्लांटमध्ये तयार केले आहे. मशीनच्या सहाय्याने चार – पाच तासात एक एकर शेतातील ऊस आरामात तोडला जातो. गुलालपूर गावात भाकियू चे जिल्हा महासचिव चौधरी वीरेंद्र सिंह ऊसाची शेती करतात.
ते म्हणाले की, त्यांचा 12-13 एकर ऊस काही तासातच तोडला जाईल कारण मंगळवारी सकाळपासून मशिन सुरु आहे. जर हे काम मजूरांकडून करुन घेतले असते तर कदाचित पूर्ण महिना त्यात गेला असता. तसही 45 रुपये क्विंटल खर्च केल्यानंतरही मजूर उपलब्ध होत नाहीत. पण शुगर केन हार्वेस्टर ने ही गोष्ट सोपी केली आहे. आसपासच्या अनेक गावांत शेतकरी मशीन च्या सहाय्याने ऊस तोडणी करत आहेत. मशीन जमिनीबरोबर ऊस तोडते. यामुळे कोणतीही गोष्ट नष्ट होत नाही. पण याचा फायदा ट्रंच पध्दतीने ऊसाची लागवड केलेले शेतकरीच घेऊ शकतात.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.