ऊसतोड मजुरांचा ट्रक उलटला, एक ठार

मनमाड: शुक्रवारी रात्री ऊसतोड मजुरांना घेवून जाणारा ट्रक नांदगाव तालुक्यातील कासारीनजीक चांदेश्‍वरी घाटात उलटल्याने एक जण जागी ठार झाले, तर सात जण जखमी झाले. याप्रकरणी शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता नांदगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

या अपघातात एका गायीसह तीन बैलही मृत्युमुखी पडले. गंभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर  मालेगाव येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. अपघाताची माहिती समजताच कादवा सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी व कृषी अधिकारी यांनी नांदगाव येथे धाव घेतली. घटनेनंतर ट्रकचा चालक फरार झाला आहे.

हा ट्रक नांदगाव तालुक्यातील ढेकू येथून दिंडोरी तालुक्यातील कादवा साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी मजूर घेऊन जात होता. कासारीजवळील चंद्रेश्‍वरी घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटून 70 फूट खोल दरीत पडला. यात प्रल्हाद चव्हाण (30) या तरुणाचा मृत्यू झाला. ट्रकमध्ये सहा पुरुष आणि दोन महिला असे आठ ऊसतोड मजूर आणि गाई व बैलांसह 15 जनावरे होती. त्यातील  तीन बैल आणि एक गाय ठार झाली. तर इतर आठ मजूर जखमी झाले. विजय नामदेव गोवर्धन व मोतीलाल राठोड यांना प्राथमिक उपचारांनंतर मालेगाव येथे अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. इतर किरकोळ जखमींना उपचार करून घरी पाठविण्यात आले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here