ऊसाची हेक्टरी उत्पादकता २५० टनापेक्षाही अधिक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न

पुणे :वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसह कृषी विद्यापीठांकडून संशोधन आणि साखर उद्योगाकडून एकत्रितपणे ऊस उत्पादकता वाढीसाठी विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या विकास कार्यक्रमांतर्गत साखर उद्योगाकडून ऊसाची सरासरी हेक्टरी उत्पादकता ७० टनांवरून २५० टनांहून अधिक वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने पुण्यात आंतरराष्ट्रीय परिषदेचे
नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी साखर उद्योगा संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी देशात अन्नधान्याची वाढती गरज पाहता ऊसाचे क्षेत्र वाढविणे अशक्य आहे. त्याऐवजी हेक्टरी उत्पादकता वाढविण्याचे आवाहन केले.

शरद पवार यांच्या अवाहनानुसार, साखर कारखान्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. गेल्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अशोक चौगुले यांनी व्हीएसआय-०८००५ जातीच्या ऊसाचे हेक्टरी २५५ टन उत्पादन घेतले. करवीर तालुक्यातील नारायण वरुटे यांनी एमएस-१०००१ या ऊसाच्या जातीचे हेक्टरी २२८ टन उत्पादन घेतले. तर, पंढरपूर तालुक्यातील शेतकरी हणमंत बागल यांनी कोएम-०२६५ जातीचे हेक्टरी ३१५ टन उत्पादन घेतले. परंतु, सर्वच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हे शक्य होत नाही. उत्पादकता वाढीसाठी कृषी विभागाच्या पारंपरिक ऊस संकर आणि जैवतंत्रज्ञानाद्वारे ऊसपिकातील अजैविक ताणनियंत्रणावर संशोधन करण्यात येत आहे.

त्यावर बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताणनियंत्रण संस्था, कोईमतूर येथील ऊस प्रजनन संस्थेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, खत व्यवस्थापनावर आंतरराष्ट्रीय मृदा संघटना काम करीत आहेत.

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून ऊसशेतीत यांत्रिकीकरणावर भर देण्यात येत आहे. तसेच, मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या परिसरात सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा एकत्रित वापर. पाण्याची कमतरता भासणाऱ्या ठिकाणी ताण देणा-या ऊसाच्या जातीचे संशोधन करून उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती ‘व्हीएसआय’च्या तज्ज्ञांनी दिली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here