पुण्यातील उसाची होतेय आखाती देशांमध्ये निर्यात !

पुणे : पारगाव (ता. दौंड) येथील दीपक खंडेराव ताकवणे व दीपक खंडेराव ताकवणे या भावंडांनी ऊस चक्क परदेशात निर्यात केला आहे. त्यामुळे ही उसाची गोडी आखाती देशांपर्यंत पोहोचली आहे. आखाती देशात दुबई, सौदी अरेबिया, ओमान येथे उसाची ८६०३२ ही प्रजाती पाठवली गेली आहे. असायला पाहिजे. पारंपरिक लागवडीऐवजी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये लागवड केल्यास बरोबर पुढच्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात ऊस तोडणीस येतो. त्यामुळे या दोन महिन्यांमधील लागवडीला प्राधान्य मिळते.

लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ताकवणे बंधुंनी पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून १९.२८० टन ऊस पाठवला आहे. आखाती देशांमध्ये सध्या उष्णतेचे प्रमाण आपल्यापेक्षा जास्त आहे. त्या ठिकाणी ज्यूस बनवण्यासाठी उसाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र तेथे पाठवण्यासाठी ऊस उभा व सरळ असायला हवा. तरच तो स्वीकारला जातो. उसाची साधारण उंची ७ ते ८ फूट असायला हवी. त्यामध्ये शर्करेचे प्रमाण १६ ते १८ टक्के पाहिजे. निर्यातीसाठी ऊस द्यायचा असल्यास त्याची बांधणी योग्य वेळी केलेली असायला हवी. उसाच्या कांड्यामध्ये रस जास्त पाहिजे अशी मागणी असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here