मुरादाबाद : बिलारीतील एक शेतकरी ऊस शेतीतून मालामाल झाला झाहे. या शेतकऱ्याने फक्त ऊस शेती केली नाही, तर उसाच्या रसापासून विविध उत्पादने बनवली. त्यांची विक्री थेट मार्केटमध्ये केली जाते. यातून चांगला नफा मिळत आहे. ते इतर शेतकऱ्यांना ऊस उत्पादनातून अधिकाधिक नफा कसा मिळवता येईल याच्या टिप्स देतात.
न्यूज१८ मधील वृत्तानुसार, बिलारीतील शेतकरी अरेंद्र यांनी सांगितले की, जर एखादा शेतकरी याचे प्रशिक्षण घेऊ इच्छित असेल तर त्याला मोफत प्रशिक्षण दिले जाईल. बिलारी विकास भवनात त्यांचे दुकान आहे. ऊसावर आम्ही खूप दिवसापासून काम करीत होतो. माझा ऊस, माझे मशीन, माझे उत्पादन हा आमचा उद्देश आहे. उसाच्या रसापासून आम्ही उपपदार्थ निर्मिती करतो. यात व्हिनेगर, आईस्क्रीम, खीर, उसाचे लाडू असे पदार्थ तयार केले आहेत.
आपण ही सर्व उत्पादने नैसर्गिक बनवत असल्याचे शेतकरी अरेंद्र यांनी सांगितले. ते म्हणाले, यामध्ये कोणतेही केमिकल किंवा इतर कोणत्याही गोष्टींचा वापर केलेला नाही. आगामी काळात आम्ही उसापासून बनवलेल्या १५ वस्तू देऊ असे आमचे धेय्य आहे. इतर कोणी शेतकरी किंवा व्यक्ती आमच्यात सामील होऊ इच्छित असल्यास आम्ही त्याला माहिती देण्यास, मार्गदर्शन करण्यास तयार आहोत.