कोल्हापूर, ता. 26: अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यात राहिलेल्या उसाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. एकरी सरासरी चाळीस टन उत्पादन असणाऱ्या असणाऱ्या कोल्हापूरातील तब्बल 72 हजार हेक्टर उसाचे क्षेत्र पाण्याखाली राहून पन्नास ते साठ टक्के नूकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल 2 हजार 250 कोटी रुपयांचे नूकसान होणार आहे. सर्वाधिक उसाचे 27 हजार 400 व त्यानंतर करवीर तालुक्यातील 12 हजार 488 हेक्टरवरील उसाचे नूकसान झाले आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीने आणि दहा ते पंधरा दिवस पुराच्या पाण्याखाली राहिलेल्या उसाने आत जगण्याची उमेद सोडली आहे. आत्तापर्यंत 72 हजार हेक्टरवरील क्षेत्राला फटका बसला आहे. पाणी ओसरून लागल्याने कुजलेल्या उसाच्या सुखलेल्या वाड्याने पाण्यावर डोके काढले. मात्र पाणी ओसरल्यानंतरही आता दहा ते पंधरा दिवस पाण्याखाली राहिलला आणि हिरवा दिसणार उसही खराब होवू लागला आहे. पूर ओसरला असला तरीही अजून शेतात पाणी साचलेले आहे. कुजलेला किंवा खराब झालेला ऊस बाहेर काढण्यासाठी आता स्वतंत्र यंत्रणा लावावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आधीच पिक वाया गेले असताना. कुजलेले पिक बाहेर काढण्यासाठी एकरी आठ ते दहा हजार रुपये खर्च करावे लागत आहे. याच शेतात नव्याने उसाची लागण करण्यासाठी पुन्हा याची मशागत करावी लागणार आहे. यासाठी पुन्हा नव्याने तेवढा खर्च करून पुढील वर्षी म्हणजे 2020-2021 च्या गळीत हंगामापर्यंत याचा सांभाळ करावा लागणार आहे. पुराने सर्वकाही आपल्या कवेत घेतलेल्या शेतकऱ्यांना आता हताश होण्यापलिकडे दुसरे काहीही सूचेनासे झाले आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र ज्यांची घरे पाण्यात गेली तसेच पिके पाण्यात गेली यांच्यासाठी तत्काळ कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंत 72 हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊसाला फटका बसला आहे. हेक्टरी सरकारी शंभर टन उसाचे उत्पादन घेतले जाते. तर एकरी 40 टन उत्पादन होते. गेल्यावर्षीच्या तुलनेते यावर्षी प्रतिटन उसाला एफआरपी जरी तेवढीच असली तरी एकरी तीन हजार रुपये दर मिळेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे 72 हजार हेक्टरवरील तब्बल 72 लाख टन उसाला फटका बसणार आहे. त्यामुळे या 72 लाख उसासाठी मिळणारे एकूण 2 हजार 250 कोटीही पाण्यात जाणार आहेत. दरम्यान, कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून पंचमाने केले जात आहे. या पंचन्यानंतर आणखी चित्र वेगळे असणार आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.