शिरोळ : गेल्या वर्षीच्या उसाला 400 रुपये अंतिम हप्ता आणि यंदा 3500 रुपये पहिली उचल या मागणीसाठी शिरोळ तालुका युवा ऊस उत्पादक शेतकरी समितीने शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जय भवानी चौकात हा मोर्चा रोखला. मात्र शिरोळ तहसील कार्यालयावर सुरू असलेले ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीचे ठिय्या आंदोलन थांबवावे, त्यानंतर आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका मोर्चातील आंदोलकांनी घेतली. शिरोळ तहसीलसमोरील शेतकरी कृती समितीने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर युवा शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले.
युवा शेतकरी संघटनेचे प्रमुख यशवंत ऊर्फ बंटी देसाई यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. युवा आंदोलकांनी बुधवारी छत्रपती शिवाजी चौकातून रस्त्यावर ठिय्या मांडून संतप्त भावना व्यक्त केल्या. शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी मोर्चासमोर येऊन युवा शेतकरी शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले. ऊस दराबाबत व त्या अनुषंगाने आपल्या तीव्र भावना तहसीलदार हेळकर यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या विश्वास बालीघाटे, बंडू बरगाले, महेश जाधव, प्रकाश माळी, बंटी देसाई, अजित दानोळे, धीरज शिंदे, अविनाश ऊर्फ पांडुरंग माने, सचिन शिंदे, धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, अक्षय पाटील, कृष्णात पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रफुल्ल कोळी, रणजित माने, सुनील शेतकऱ्यांचा लढा, असा फलक देशमुख, दत्तात्रय ठेकणे, सागर माने आदी आंदोलनात सहभागी झाले होते.