जयपूर : अलीकडेच देशातील अनेक राज्यांनी ऊस दरात वाढीची घोषणा केली आहे. आता यामध्ये राजस्थानचाही समावेश झाला आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी गळीत हंगाम २०२१-२२ साठी Rajasthan State Ganganagar Sugar Mills (RSGSM) कडून ऊस खरेदी दरात प्रती क्विंटल ५० रुपये वाढीस मंजुरी दिली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदी दरात वाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी प्रती क्विंटल ५० रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे.
या निर्णयानंतर RSGSM प्रगत प्रजातीचा ऊस ३६० रुपये प्रती क्विंटल, मध्यम श्रेणीचा ऊस ३५० रुपये प्रती क्विंटल आणि उशीरा पक्व होणारा ऊस ३४५ रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी करेल.
सरकारच्या या निर्णयाने ऊस उत्पादक शेतकरी खुश झाले आहेत.