रायपुर(छत्तीसगढ़): छत्तीसगढ़ चे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले की, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या ऊसाला 355 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे दर देणार आहे . ज्यामुळे राज्यातील ऊस शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने आपल्या घोषणा पत्रामध्ये ऊसाचे मूल्य 355 रुपये करण्याचे वचन दिले होते, जे सीएम बघेल यांनी पूर्ण केले आहे.
मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, राज्याच्या काँग्रेस सरकारने घोषणा पत्रात दिलेले वचन पूर्ण केले आहे. तसेच तांदळाच्या एमएसपी मध्येही वाढ केली आहे . आता राज्यामध्ये राजीव गांधी किसान न्याय योजने अंतर्गत शेतकऱ्यांकडून 2500 रुपये प्रति क्विंटल दराने तांदूळ खरेदी केले जातील. बघेल म्हणाले, राज्यातील सध्याच्या सरकारच्या शेतकरी हीताच्या धोरणा मुळे, शेती सोडलेले 2.5 लाख शेतकरी पुन्हा शेतीकडे परत आले आहेत , जे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले आहे. अवैध दारुवर प्रतिबंध लावण्या संदर्भात बोलताना सीएम बघेल म्हणाले, यासाठी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकाना जबाबदार ठरवले जाईल.
यापूर्वी राज्यातील ऊस शेतकऱ्यांनी ऊस दर 355 रुपये करण्याची मागणी केली होती, ज्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने ही केली होती.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.