ऊस दर ६०० रुपये प्रती क्विंटल जाहीर करा : भगत सिंह वर्मा

सहारनपूर : राज्य सरकार साखर कारखान्यांच्या सोबत मिळून शेतकऱ्यांचे शोषण करीत आहे, असा आरोप पश्चिम प्रदेश मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगत सिंह वर्मा यांनी केला. देवबंदमध्ये पश्चिम प्रदेश मुक्ति मोर्चाची खडंजा अहमदपूरमध्ये बैठक झाली. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष वर्मा बोलत होते.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राष्ट्रीय अध्यक्ष वर्मा म्हणाले की, गेल्या काही वर्षात उशीरा देण्यात आलेली ऊस बिले व्याजसकट देण्याची गरज होती. मात्र, तसे झालेले नाही. उसाचा उत्पादन खर्च पाहता सरकारने आगामी हंगामासाठी ऊस दर ६०० रुपये प्रती क्विंटल करण्याची गरज आहे. जर शेतकऱ्यांना उशीरा मिळणारे उसाचे पैसे व्याजासह दिले नाही तर शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल. हाजी मोहम्मद आरिफ, ऋषिपाल प्रधान, सुनील शर्मा, कल्याण सिंह, खलील अहमद, कृष्णपाल धीमान, रविंदर धीमान, राजपाल धीमान आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here