लाहोर : ऊस नियंत्रण बोर्डाने (एससीसीबी) पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या गळीत हंगामात ऊसाचा किमान खरेदी दर (एमआरपी) २५० रुपये प्रती ४० किलो निश्चित करण्याचा प्रस्ताव ठेवण्याबाबत विचार चालविला आहे. सरकारने कृषी, अन्न आणि इतर संबंधीत एजन्सींना उसाचे समर्थन मूल्य निश्चित करण्यासाठी उत्पादनासाठी येणारा खर्च ठरविण्यास सांगितले आहे. गेल्या हंगामात उसाचा दर २२० रुपये प्रती ४० किलो निश्चित करण्यात आला होता. यंदा शेतीच्या खर्चातील वाढ आणि विंधनविहिरींसाठीच्या वाढीव वीज बिलामुळे ऊस दरवाढीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एससीसीबीने गेल्या वर्षीच्या दरात किमान ३० रुपये वाढीचा प्रस्ताव ठेवण्याची तयारी केली आहे. ऊस खरेदी दरात वाढीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मात्र सरकारकडे असतील.
देशात सलग दुसऱ्या वर्षी ऊसाच्या लागणीचे क्षेत्र उद्दिष्टापेक्षा अधिक झाले आहे. पंजाबचे ऊस आयुक्त मुहम्मद जमा बट्टू यांनी सांगितले की, चांगल्या हवामानामुळे यंदा पिक चांगले येईल अशी शक्यता आहे. संभाव्य ऊस दराबाबत विचारले असता ते म्हणाले, एससीसीबीद्वारे विविध विभागांकडून माहिती घेऊन पिकांच्या उत्पादन खर्चावर चर्चा आणि निश्चितीबाबत निर्णय घेतला जाईल. या हंगामात पंजाब प्रांतात सहा मिलियन टन उत्पादन होईल. जवळपास ०.४-०.५ मिलियन टन साठा उपलब्ध होईल. गेल्या वर्षी पंजाबने ५.७ मिलियन टन साखर उत्पादित केली होती. तर ५०,०००-६०,००० टन साठा आधीचा शिल्लक होता.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link