ढाका : शेतकऱ्यांना तपासणी समितीच्या अहवाल आल्यानंतर ऊस दरवाढ केली जाईल असे आश्वासन उद्योग मंत्री मजीद महमूद हुमायूं यांनी दिले. दुसरीकडे वाणिज्य मंत्री टीपू मुन्शी यांनी दर्शन येथे केयरव अँड कंपनीच्या दुसऱ्या युनिटची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. मद्य, हँड सॅनिटायझर, कार्बनिक सॉल्व्हंट, शिरा आदी उत्पादनांची मागणी वाढली आहे. बांगलादेश शुगर अँड फूड कॉर्पोरेशनच्या (बीएसएफसी) अंतर्गत शेतकरी आणि साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी चर्चेनंतर उसाचे दर वाढविण्याबाबत शेतकऱ्यांना आश्वासन दिले. मंत्री दर्शन साखर कारखान्यात २०२१-२२ या हंगामासाठी ऊस गळीत हंगामाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करीत होते.
प्रमुख पाहुणे असलेल्या मंत्री नुरुल मजीद महमुद यांनी सांगितले की, देशात १८ लाख टन साखरेची मागणी असते. मात्र. महामंडळाच्या अंतर्गत येणारे साखर कारखाने केवळ ८०,००० टन साखरेचे उत्पादन करतात. उर्वरीत १७.२ लाख टन साखर आयात केली जाते. जुनी मशीनरी, ऊस उत्पादनाचे पुरातन तंत्रज्ञान, तोडणी आणि गाळप प्रक्रिया यामुळे उत्पादन कमी होत असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले, साखर कारखान्याना अधिक काळ आणि कामगारांची गरज असते. मात्र, उत्पादन कमी होते. साखर कारखान्यांनी उप उत्पादन, उत्पादनातील विविधता आणि लावणीनंतर जैविक उत्पादनांची वाढ यावर भर दिला पाहिजे असे ते म्हणाले. नुरुल मजीद यांनी उसाच्या एका उच्च गुणवत्तेच्या प्रजातीची निर्मिती करण्याबाबत प्रायोगिक कार्यक्रमाबाबत आश्वासन दिले.