जवाहरपूर साखर कारखान्याची ऊस खरेदी ठप्प

सीतापूर : अपुऱ्या तयारी सोबत सुरू करण्यात आलेल्या जवाहरपूर साखर कारखान्यातील व्यवस्थापनाची चार दिवसातच पोलखोल झाली आहे. कारखान्याने उसाचे वजन करणे बंद केले आहे. शेतकऱ्यांना आता ऊस घेऊन दिवस-रात्र उघड्यावर काढावी लागत आहे. रविवारी कारखान्याने शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक वाढवल्या. ऊस उत्पादकांना मोबाईलवर मेसेज पाठवून ऊस घेऊन येऊ नये असा निरोप दिला आहे. परिणामी ऊस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या दीड किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. वाहन कोंडीत सतत वाढ होत असून वजन बंद पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना सध्या खते खरेदी करतानाही अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. काही जणांना यासाठी धान्य विकावे लागले आहे. अशा संकटांशी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांना जवाहरपूर साखर कारखान्याच्या गैर व्यवस्थापनामुळे नवे संकट समोर आले आहे. कारखाना सुरू करताना शेतकऱ्यांसमोर प्रशासनाने अनेक देवा केले. सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात, चौथ्या दिवशी, रविवारी सकाळी शेतकऱ्यांनी १६ नोव्हेंबरपर्यंत ऊस आणू नये असे आदेश दिले आहेत.

गडरियनपूरवाचे शेतकरी मंगरेलाल यांच्या मोबाईलवर कारखान्यात ऊस वाहनांची गर्दी झाली असून त्यांच्या उसाचे १४ रोजी वजन होणार नाही. १६ नोव्हेंबरनंतर उसाचे वजन होईल असा मेसेज आला. त्यामुळे ते हवालदिल झाले. तशीच स्थिती इंदरौली गावचे शेतकरी अनुज वर्मा यांची झाली आहे. कारखाना प्रशासनाने मात्र यासंदर्भात उत्तर देणे टाळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here