चांगल्या बियाण्यापासून ऊस उत्पादन, साखर उताऱ्यात होणार वाढ

कुशीनगर : उसाच्या प्रगत प्रजातींपासून साखर उतारा आणि ऊस उत्पादन वाढू शकते. गेंदा सिंह ऊस संशोधन संस्थेने विकसित केलेल्या कोसी ८४५२, १३४५२, ११४५३ या प्रजातींचा यामध्ये समावेश आहे. या प्रजातीच्या उसापासून साखर उतारा वाढीस मदत मिळते अशी माहिती वरिष्ठ संशोधक डॉ. कृष्णानंद यांनी दिली. गेंदा सिंग संशोधन संस्थेत उत्तर प्रदेश ऊस उत्पादक शेतकरी तथा प्रशिक्षण संस्था गोरखपूरच्यावतीने आयोजित देवरिया तथा गोरखपूर विभागातील ऊसपर्यवेक्षकांच्या तीन दिवसीय प्रशिक्षक कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. ऊसाच्या प्रगत प्रजाती विकसित करण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागतो असे ते डॉ. कृष्णानंद म्हणाले.

पिपराईच गोखपूर संशोधन संस्थेचे सहाय्यक संचालक डॉ. ओमप्रकाश गुप्ता म्हणाले की, उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे ऊस उत्पादक राज्य आहे. गोरखपूर आणि देवरिया विभागात ऊस विकासाच्या शक्यता अधिक आहेत. उसाच्या टीश्यू कल्चरपासून केलेल्या लागणीचा फायद अधिक होईल. यावेळी कीटक तज्ञ डॉ. वाय. पी. भारती यांनी मार्गदर्शन केले. ०.२३८ प्रजातीचे बियाणे लाल सड रोगाला बळी पडते. त्याची लागण कमी होईल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांना पूरक पिक उत्पादनाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here