भोपाळ : बुरहानपूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात केळ्याचे उत्पादन होत असल्याचे लक्षात घेऊन केळी निर्यातीसाठी योजना तयार केली जाईल. स्वर्गीय नंदकुमार सिंह यांनी यासाठी प्रयत्न केले होते. याशिवाय, जिल्ह्यात शंभर एकर क्षेत्रात असलेल्या ऊस संशोधन केंद्राला त्यांचे नाव दिले जाईल असे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.
मुख्यमंत्री चौहान म्हणाले, दिवंगत नंदकुमार सिंह हे शाहपूर नगरपालिकेचे पदाधिकारी होते. त्यांचा पुतळा उभारला जाईल. याशिवाय नगरपालिका भवनालाही त्यांचे नाव दिले जाईल. मुख्यमंत्री म्हणाले, नंदकुमार सिंह यांना फक्त शब्दांनीच नव्हे तर त्यांची स्वप्ने पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.