शामली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांसमोर आता ऊसाचे संकट निर्माण झाले आहे. अतिशय कमी ऊस गाळपास येवू लागल्याने जिल्ह्यातील ऊन आणि थानाभवन साखर कारखाने पुढील दोन दिवसांत गाळप हंगाम समाप्त करतील अशी शक्यता आहे. शामली साखर कारखानाही ७ ते ८ मेपर्यंत आपले गाळप थांबविण्याची शक्यता आहे.
यावर्षी जिल्ह्यातील कारखान्यांचा गाळप हंगाम एक नोव्हेंबर २०२० रोजी सुरू झाला. गाळप लवकर सुरू झाल्याने शामली साखर कारखाना वगळता ऊन आणि थानाभवन कारखाना सहा मे रोजी गाळप सत्र संपविणार आहे. शामली कारखाना ७ अथवा ८ मे रोजी गाळप समाप्त करेल. एक आठवड्यापासून कारखान्याकडे उसाचा तुटवडा आहे. २६ एप्रिल रोजी मतदानादिवशी कारखान्याकडे गाळपास ऊसच आला नाही.
ऊन कारखान्याचे महाव्यवस्थापक अनिल अग्रवाल यांनी सांगितले की, कारखान्याची गाळप क्षमता ७० हजार क्विंटल प्रतिदिन आहे. मात्र, कारखान्याकडे ३५ हजार क्विंटल ऊसच येत आहे. मतदानादिवशी ऊन कारखान्याकडे १६ तास ऊस उपलब्ध नव्हता. २९ एप्रिल रोजी कारखाना बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ३० एप्रिल रोजी गाळप समाप्त केले जाईल. कारखान्याने आतापर्यंत एक कोटी ४ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे.
बजाज समूहाच्या थानाभवन कारखान्याकडेही उसाची टंचाई आहे. युनीट हेड वीरपाल सिंह यांनी सांगितले की कारखान्याची गाळप क्षमता ९० हजार क्विंटल आहे. मंगळवारी ५५ हजार क्विंटल ऊस उपलब्ध झाला. तर बुधवारी फक्त ४० हजार क्विंटल आला. थानाभवन कारखाना ३० एप्रिल रोजी हंगाम समाप्त करेल असे त्यांनी सांगितले. २८ एप्रिलअखेर कारखान्याने एक कोटी ३३ लाख क्विंटल उसाचे गाळप केले. शामली कारखान्याचे वरिष्ठ व्यवस्थापक दीपक राणा यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून ऊस टंचाई भासत आहे. २८ एप्रिलपर्यंत कारखान्याने एक कोटी तीन लाख क्विंटंल उसाचे गाळप केले. कारखाना ८ मेपर्यंत आपले गाळप बंद करेल.