कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ३.५० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याने गाळपास आलेल्या ऊसाची बिले ३,१०० रुपये प्रती टनप्रमाणे विनाकपात एकरक्कमी अदा केली आहेत. तोडणी वाहतुकीची बिले नियमितपणे आदा केली जाणार आहेत अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी दिली. कारखान्याने १ ते १५ डिसेंबर या कालावधीत झालेल्या ऊस बिले दिली असल्याची माहिती धुरे यांनी दिली.
कारखान्याच्यावतीने ज्या भागात जंगली जनावरांचा उपद्रव आहे, अशा ठिकाणी तातडीने यंत्रणा देऊन संबंधित ठिकाणचा ऊस काढण्याचे नियोजन केले आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष मधुकर देसाई, संचालक विष्णू केसरकर, उदय पोवार, मुकुंद देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, प्र. कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.