थकीत ऊस बिलांबाबत ऊस राज्यमंत्र्यांचा कारखान्यांना कारवाईचा इशारा

मेरठ : उत्तर प्रदेशचे ऊस विकास तथा साखर उद्योग राज्यमंत्री संजय सिंह गंगवार यांनी मेरठ येथे आढावा बैठक घेतली. जे कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले देणार नाहीत, त्यांच्या अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. आगामी गळीत हंगाम २०२२-२३ साठी साखर कारखान्यांची देखभाल, दुरुस्तीचे काम गुणवत्ता मानकांच्या आधारावर करावे असे निर्देश त्यांनी दिले. ऊस समित्यांना मशीनरी बँकेचा प्रसार करून शेतकऱ्यांना लाभ द्यावा अशी सूचना मंत्र्यांनी यावेळी केली.

पत्रिका मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस राज्यमंत्री संजय सिंह गंगवार म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे देणे हा साखर कारखान्यांचा प्राधान्यक्रम असला पाहिजे. आढावा बैठकीत ऊस उपायुक्त राजेश मिश्र, साखर उपायुक्त डॉ. सुभाष यांच्यासह जिल्हा ऊस अधिकारी, साखर कारखान्यांचे अध्यक्ष, युनिट हेड उपस्थित होते. यावेळी मवाना, नंगलामल, दौराला, सकौती, साबितगढ, अनामिका तथा बुलंदशहर साखर कारखान्यांनी शंभर टक्के ऊस बिले दिल्याचे स्पष्ट झाले. इतर ऊस बिले थकविणाऱ्या कारखान्यांनी २०२२-२३ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी शंभर टक्के पूर्तता करावी अशी सूचना केली. तसे न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here