सोलापूर : सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४- २५ चा ६३ वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ गुरुवारी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाला. यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालक रामचंद्र ठवरे व त्यांच्या पत्नी कुसुम ठवरे या उभयतांच्या हस्ते झाली. यावेळी कारखान्याचे संचालक ॲड. प्रकाश पाटील म्हणाले की, सहकार महर्षीनी उभा केलेल्या या कारखान्यात शेतकरी दरासाठी नव्हे तर योग्य ऊस बिलाची १०० टक्के हमी असल्यानेच ऊस घालतो. येथे फक्त ‘सहकार महर्षी’ हे नावच महत्वाचे आहे, कारण येथे लोकांचा विश्वास जपला जातो.
कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी सांगितले की, चालू गळीत हंगाम २०२४- २५ मध्ये ९ लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. प्रती दिन ८५०० मे. टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी यंत्रप्रणाली कार्यान्वीत केली आहे. सभासद व बिगर सभासद यांनी नोंदीचा व बिगर नोंदीचा सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे. कार्यक्रमास व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालक लक्ष्मण शिंदे, नानासाहेब मुंढफणे, विजयकुमार पवार, रामचंद्र सीद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, भीमराव काळे, गोविंद पवार, रामचंद्र सावंत पाटील, संचालिका सुजाता शिंदे, रणजित रणनवरे, पांडुरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, विनायक कैचे, राजेंद्र भोसले, अमृतराज माने-देशमुख, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, अनिल कोकाटे, श्रीकांत बोडके, हर्षाली निंबाळकर आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.