आजमगढ़ : पावसामुळे साखर कारखाना क्षेत्रातील ऊस सर्वे चे लक्ष्य अजून पूर्ण होऊ शकलेले नाही. तर सर्वेची निर्धारित तारीख ३० जूनही आता संपली आहे. हे प्रकरण गंभीरपणे घेऊन विभागाने सर्वेची मुदत वाढवून १० जुलै पर्यंत केली आहे. आता विभाग ऊस सर्वेचे काम युद्ध पातळीवर केले जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजून सर्वे केलेला नाही , त्यांचा ऊस चालू गाळप हंगामात गाळप केला जाणार नाही.
शेतकरी सर्वे च्या 2020-21 या गाळप हंगामासाठी ऊस आयुक्तांनी ऊस क्षेत्रफळाचे कार्य वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या पालनामध्ये सर्वे केला जात होता, जो ३० जूनपर्यंत संपणार होता. पावसामुळे सर्वे कार्य आतापर्यंत पूर्ण केले जाऊ शकलेले नाही. जिल्हा ऊस अधिकारी अशरफी लाल म्हणाले, सर्वे त्याच व्यक्ति च्या नावाने केला जाईल, जे नाव महसुली अभिलेखांमध्ये नोंदले आहे. सर्व शेतकऱ्यांनी घोषणा पत्र भरणे अनिवार्य आहे. जो शेतकरी घोषणा पत्र भरणार नाही त्याचा ऊस चालू गाळप हंगामात गाळप केला जाणार नाही. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी सर्वे टीम ला सहकार्य करुन आपल्या ऊसाचा खरा सर्वे नोंद करावा. जेणेकरुन शेतकऱ्यांच्या सर्वे आकडयात कोणतीही त्रुटी येऊ नये.
Audio Playerहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.