हल्दौर : बिलाई साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील ऊस सर्वेक्षण गतीने सुरू आहे. कारखान्याची पन्नास पथके २८२ गावांमध्ये सर्व्हे करीत आहेत. जवळपास ९० टक्के सर्व्हे पूर्ण झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. सर्व शेतकऱ्यांनी सर्व्हेनंतर उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेता पथकांकडून सर्व्हेच्या पावत्या घ्याव्यात असे आवाहन कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
बिलाई साखर कारखान्याने कार्यक्षेत्रात ११ मे रोजी ऊस सर्व्हेला सुरुवात केली. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ८८२ गावांतील शेतकऱ्यांचा सर्व्हे करण्यासाठी ५० पथके नेमण्यात आली. आठ पर्यवेक्षक या पथकांच्या देखरेखीसाठी नियुक्त करण्यात आले. संयुक्त पथकांकडून सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये साखर कारखाना आणि ऊस समितीचा प्रत्येकी एक कर्मचारी सर्वेक्षणावेळी उपस्थित राहतो. सर्वेक्षणाची अंतिम मुदत १५ जून आहे. पथकांनी आतापर्यंत ९० टक्के सर्वे केला आहे.
याबाबत ज्येष्ठ ऊस निरीक्षक अमित पांडे म्हणाले, सर्व शेतकऱ्यांनी मुदतीत आपल्या उसाची नोंद करावी. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण होणार नाही, त्यांची तोडणी केली जाणार नाही.
कारखान्याचे ऊस विभागाचे महा व्यवस्थापक परोपकार सिंह म्हणाले, कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊसाचे सर्वेक्षण मुदतीत पूर्ण केले जाईल. शेतकऱ्यांनी सर्व्हे नंतरची स्लीप आपल्याकडे घ्यावी. त्यातून नंतरच्या त्रुटी दुरुस्त केल्या जाऊ शकतात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link