मेरठ : टिकोला आणि मवाना साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील ऊसाचे सर्वेक्षण सुरू केले आहे. कोरोना महा रोगराईचा धोका लक्षात घेऊन यंदा सर्व्हेच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये असलेल्या पिकांचाच सर्व्हे केला जाणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांचे हमीपत्र पर्यवेक्षकांच्या मदतीने ऑनलाईन भरून घेतले जाणार आहे. यावेळी केवळ ऊस लागवडीचे क्षेत्रच मोजले जाणार आहे. हे सर्वेक्षण ३० जून अखेर पूर्ण होईल.
मवाना ऊस समितीचे विशेष सचिव प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग पसरल्याने यावेळी ऊस सर्वेक्षण पद्धतीत बदल करण्यात आला आहे. यावेळी केवळ लागवडीचा सर्व्हे होईल. गेल्यावर्षीच्या उसाबाबत आधीची नोंद गृहीत धरली जाईल. मवाना ऊस समिती आणि रामराज ऊस समितीशी संबंधीत सर्व गावांतील शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पडताळणी सुरू झाली आहे. ती ३० जूनपर्यंत सुरू राहील.
मवाना ऊस विकास परिषदेचे ज्येष्ठ ऊस निरीक्षक सोबिर सिंह यांनी नव्या पद्धतीची माहिती देताना सांगितले की, ज्या शेतकऱ्यांचा गेल्यावर्षी ऊस होता, त्याची नोंद वेगळी घेतली जाईल. यादरम्यान, टिकोला साखर कारखान्याचे ऊस विभागाचे सर व्यवस्थापक साईम अन्सार, ऊस अधिकारी अनुपम देओल आदी उपस्थित होते.