रामपूर : आगामी गळीत हंगामाच्या दृष्टीने जिल्ह्यात विभाग स्तरावर तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार एक मे रोजी जीपीएस तंत्राद्वारे उसाचा सर्व्हे सुरू करण्यात येणार आहे. हा सर्व्हे ३० जूनपर्यंत सुरू राहील.
सर्व्हेसाठी ७५ ऊस पर्यवेक्षकांची नियुक्ती करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच शेतकऱ्यांना आपल्या लागवडीची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एक मेपासून ३० जूनपर्यंत सर्व्हेचे काम सुरू राहील अशी माहिती जिल्हा ऊस अधिकारी हेमराज सिंह यांनी दिली. या कालावधीत शेतकऱ्यांनी आपल्याकडील माहिती अपडेट करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ई गन्ना अॅपच्या माध्यमातून आपला मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक आदी माहिती स्वतः अपलोड करावा. यासोबतच शेतकऱ्यांनी enquiry.caneup.in या वेबसाइटवर आपले शपथपत्र अपलोड करावे. चुकीचा मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक वा इतर माहिती देणारी खाती बंद केली जातील. एकाच मोबाईल क्रमांकावर सहा अथवा त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांची खाती लिंक असतील तर तीही बंद केली जाणार आहेत.