सोमेश्वर कारखान्यातर्फे ऊस खोड कीड व्यवस्थापन, नियंत्रण अभियान

पुणे : सोमेश्वर कारखान्याच्या वतीने कारखाना कार्यक्षेत्रात ऊसखोड  कीड व्यवस्थापन व नियंत्रण अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव व ऊसविकास अधिकारी विराज निवाळकर यांनी दिली. शेतकऱ्यांनी अभियानाची माहिती घेऊन खोडकिडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.

किडीची ओळख व जीवनक्रम…

पतंग : ओळख पतंग करडे तपकिरी किंवा वाळलेल्या गवताच्या रंगाचे असून, नर पतंगापेक्षा मादी पतंग मोठे असतात. नर पतंगाच्या मिशा यांच्या माळेच्या आकाराच्या असतात.

जीवनक्रम: पतंग ४ ते ९ दिवस जगतात. नर आणि मादीचे प्रमाण २ः१ असते. खोडकिडीच्या एक पिढीचा जीवनक्रम ३०० ४५ दिवसांत पूर्ण होतो. किडीचा जीवनकाळ पिकांची जात आणि हवामानानुसार बदलतो.

अंडी : अंडी नेहमी ओळीत पुंजक्याच्या स्वरूपात उसाच्या पानांच्या पाठीमागे ६५ ते ८७ च्या दरम्यान घातली जातात. ताजी अंडी ही पारदर्शक असतात; परंतु काही तासांतच ती दुधाळ पांढरी होतात, अंडे रुंद असते. सूक्ष्मदर्शकाखाली खोडकिडीच्या अंडयाचा पुंजका साबूदाण्याच्या खिरीसारखा दिसतो, अंडी गोलाकार वे लांब गोलाकार एकाच आकाराची असतात. पानाच्या पाठीमागे घट्टपणे चिकटलेले असतात.

जीवनक्रम: अंडी पानांच्या पाठीमागे ६५ से ८७ च्या दरम्यान पुंजक्याने पातली जातात, अंडी खालच्या तीन हिरव्या पानांवर चार ते सहा जोड ओळीत, पानांच्या देठाकडे किंवा मध्यभागी घातली जातात,

अळी : नुकतीच बाहेर पडलेली प्रथम अवस्थेतील अळी करड्या रंगाची १.५ मिमी लांब असते. काही मिनिटे पानांच्या मऊ पेशीवर उपजीविका करते. अळी ५ वेळा कात टाकून ६ रूपांतर अवस्थेतून जाते. पूर्ण बाद झालेली अळी २० ते ३० मिमी लांब व ४ मिमी रुंद, मळकट पांढऱ्या रंगाची दिसते. उसावरील खोडकिडीच्या अळीचे डोके काळे असते आणि अंगावर पाच जांभळट तपकिरी रंगाचे समांतर पट्टे असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here