ऊसावरील रोगांपासून बचावाबाबत मार्गदर्शन

शामली : खतौली साखर कारखाना आणि फुगाना गावात आयोजित शेतकरी मार्गदर्शन चर्चासत्रात शेतकऱ्यांना उसाच्या ०२३८ प्रजातीपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी शेतकऱ्यांना आधुनिक ऊस शेती पद्धतींची माहिती दिली. उसावरील कीड, रोगांचे नियंत्रण कसे करावे याबाबत त्यांनी जनजागृती केली.

याबाबत अमर उजाला डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, फुगाना गावातील उत्सव डेअरीत खतौली साखर कारखान्याच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्याचा प्रारंभ जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिहं यांच्या हस्ते झाला. ऊसावरील रोगावर वेळीच उपचार करून शेतकऱ्यांनी नव्या प्रजातींच्या उसाची लागण करावी असे त्यांनी सांगितले. शामली कृषी विज्ञान केंद्रातील वैज्ञानिक डॉ. विकास मलिक यांनी शेतीसाठी ट्रायकोडर्मा तसेच बीज उपचाराबाबत माहिती दिली. खतौली कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. अशोक कुमार यांनी शेतकऱ्यांना ०२३८ या उसाच्या प्रजातीला लाल सड रोगाबाबत विशेष माहिती सांगितले. ऊस विभागाचे महाव्यवस्थापक कुलदीप राठी, वरिष्ठ ऊस व्यवस्थापक विनेश कुमार यांनी मार्गदर्श केले. अध्यक्षस्थानी ओमपाल मलिक फुगाना होते. ऊस व्यवस्थापक देवेंद्र कालखंडे, राजकिशोर, देवराज, मुकेश कुमार, मोनू, बिल्लू, संजीव, योगेंद्र लिसाढ़, जोगेंद्र आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here