रुडकी : ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक बी. के. चौधरी यांच्या नेतृत्वाखालील टीमने थिथकी गावातील ऊस सर्वेक्षणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी ऊस विकास विभागाकडून ऊस पर्यवेक्षक मुकेश कुमार, कारखान्याचे ऊस पर्यवेक्षक गोविंद कुमार यांनी सर्वेक्षण केले. जीपीएस प्रणालीचा वापर करून सर्व्हेचे हे काम सुरू आहे. त्याची मॅन्युअली तपासणी करण्यात आली. हे क्षेत्रफळ समान आले.
याबाबत लाईव्ह हिंदूस्थानने दिलेल्या वृत्तानुसार, ऊस सर्वेक्षणावेळी शेतकऱ्यांनीही सहकार्य केले. बी. के. चौधरी यांनी सांगितले की, विभागातील ज्या शेतकऱ्यंनी नॅनो युरियाचा वापर केला आहे, त्याचे परिणाम चांगले दिसून येत आहेत. शेतकऱ्यांनी नियमित युरीयाऐवजी नॅनो युरियाचा वापर करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी ऊस पर्यवेक्षकांना सहकार्य करून आपल्या शेताती सर्व्हे तातडीने करावा असे आवाहन करण्यात आले. त्यातून ऊस गाळपावेळी येणारे सर्व अडथळे दूर होतील असे सूत्रांनी सांगितले. निरीक्षक पथकामध्ये बी. के. चौधरी यांच्याशिवाय सुरेश कुमार, सुरेंद्र सिंह, बालेंद्र सिंह आदी उपस्थित होते.