नांदेड: यंदाच्या गाळप हंगामात ऊसाला चांगला भाव देवू, असे आश्वासन शिवणी येथील धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिले.
धाराशिव साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक तीनच्या, दुसर्या गाळप हंगामाचा बॉयरल अग्नीप्रदीपन सोहळा आज कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या वेळी साईनाथ ढोणे यांच्या हस्ते सपत्नीक होम हवन करण्यात आले.
पाटील पुढे म्हणाले की, यंदा पाऊस चांगला झाल्याने ऊसाच्या क्षेत्रामध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांनी आपल्या ऊसाच्या नोंदी कारखान्याकडे द्याव्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही कारखान्यातील काम चिकाटीने करण्यात आले. आणि आज सर्वच निष्ठावंतांच्या कष्टाने कारखाना गाळपास सज्ज झाला आहे. यंदा ऊसाला चांगला भाव देण्यात येईल.
याप्रसंगी दि महाराष्ट्र राज्य शिखर बँक नांदेडचे सहव्यवस्थापक भरत पाटील, वसंत शिंदे, कार्यकारी संचालक अमर पाटील, सर्व संचालक, भागातील सरपंच, उपसरपंच, शेतकरी, कर्मचारी, वाहतुक ठेकेदार आदी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी मानले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.