कोल्हापूर ता 28: ऊस तोडणी व वाहतूकीची दरवाढ करावी, राज्य शासनाने घोषित केलेल्या माथाडी बोर्डाची तत्काळ अंमलबजावणी करावी, तसेच ऊस तोड मजूरांना भविष्यनिर्वाह निधी मिळावा यासह इतर मागण्यांसाठी ऊस तोडणी व वाहतूक कामगार 1 ऑक्टोबर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचीमाहिती संघटनेचे राज्य सरचटणीस डॉ. सुभाष जाधव यांनी दिला आहे. कोल्हापूर प्रेस कल्ब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
डॉ. जाधव म्हणाले, ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. शासनाकडे वारंवार मागण्या करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यापार्श्वभूमीवरऊस तोडणी व वाहतूक कामगार यावर्षी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच आपली ताकद दाखवून देतील. दरम्यान, कामगाराच्या मागण्या त्वरीत मान्य कराव्यात अन्यथा 1ऑक्टोंबरला साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला जाईल. सिटू सलग्न महाराष्ट ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेने राज्यातील ऊस तोडणी व वाहतूकीच्यादरवाढीचा त्रिपक्षीय करार करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात कारखाने व विभागीय पातळीवर मेळावे घेण्यात येणार आहेत, असेही डॉ. जाधव यांनीसांगितले. यावेळी राज्य उपाध्यक्ष प्रा आबासाहेब चौगुले, दिनकर आदमापूरे, विलास दिंडे आदि उपस्थित होते.