चंदीगढ(पंजाब): पंजाबचे सहकारमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी रविवारी सांगितले की, शुगरफेडने कोव्हीड -१९ च्या संकटकाळात जनतेला २१.०७ लाख किलो साखर पुरविली आहे आणि प्रसंगी शक्य त्या प्रकारे मदत करण्याची जबाबदारी स्विकारण्याची तयारी दाखवली आहे.
याशिवाय मुख्यमंत्री म्हणाले, शुगरफेडचे अधिकारी व कर्मचार्यांनीही मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडामध्ये २९.०५ लाख रुपयांचे योगदान दिले आहे. त्यांनी मिल्कफेडच्या सर्व अधिकाऱ्यांचे ही आभार मानले. या कठीण काळात दान करण्यासाठी पुढे येत असलेल्या सर्वांचेच त्यांनी यावेळी आभार मानले.