चंदीगढ : चीनी मंडी
पंजाबचे सहकार मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी रविवारी सांगितले की, कोरोना महामारीच्या संकटा दरम्यान शुगरफेड यांनी सामजिक बांधिलकी म्हणून लोकांना 21.07 लाख किलो साखरेचा पुरवठा केला आहे.
मंत्री म्हणाले, शुगरफेडचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीदेखील मुख्यमंत्री कोविड -19 रिलीफ फंडासाठी 29.05 लाखाचा निधी दिला आहे. त्यांनी या संकटात राज्यातील लोकांना आवश्यक वस्तू साखरेच्या पुरवठ्यासाठी शुगरफेड यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
शुगरफेडचे एमडी पुनीत गोयल यांनी सांगितले की, त्यांची संघटना आणि राज्यातील सहकारी साखर कारखाने या गरजेच्या वेळी राज्यातील लोकांना आवश्यक वस्तूंची कमी पडू देणार नाही. पंजाबमध्ये देखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, आणि राज्य सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी हर एक प्रयत्न केला जात आहेत.