मुजफ्फरनगर : स्वच्छ उसाचा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा एका कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात आले. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सागितले की, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढवावे. ऊस विभाग आणि साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने अनेक नव्या प्रजातींवर संशोधन सुरू आहे. त्यामुळे कमी खर्चात उत्पादकता वाढू शकते.
ऊस विभागाचे उप महाव्यवस्थापक ए. के. सिंह यांनी मिरापुर दलपत येथील कर्तारसिंग, याहीतपूरचे रोहताश, बहादरपूरचे शेतकरी गुलशन यांना स्वच्छ ऊस पुरवठा केल्याबद्दल पुरस्कार दिला. ते म्हणाले, ऊस समितीकडून एसएमएस आल्यानंतर शेतकऱ्यांनी उसाची तोडणी सुरू करावी. ऊस तोडून शेतात ठेवून होणाऱ्या नुकसानीचा शेतकऱ्यांना अंदाज येत नाही. त्यामुळे स्वतः कष्ट करूनही कमाई खूप कमी होते. जर ऊस शिळा असेल तर त्याचा उतारा घटतो. एक ट्रॉली ऊस जर तोडून शेतात ठेवला तर दररोज वजनात दीड क्विंटलची घट होते. त्यांनी आगामी काळातील लावणीवेळी शेतात ट्रायकोडर्माचा वापर करण्याचे आवाहन केले. साखर कारखान्याकडून बियाणे प्रक्रिया यंत्र उपलब्ध आहे. त्यामध्ये ऊसाच्या बियाण्यांवर संशोधन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.