नवी दिल्ली: केंद्रतील मोदी सरकार संसदेच्या आगामी सत्रामद्ये केंद्रीय बजेट 2021-22 सादर करण्याच्या तयारीत आहे. हे बजेट अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या कडून 1 फेब्रुवारी, 2021 ला सादर करण्याची शक्यता आहे. प्रत्येक वेळेप्रमाणे यावेळीही आर्थिक मंत्रालयाने केंद्रीय बजेट साठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. जर आपल्या जवळही बजेट बाबत काही सूचना असतील, तर आपले विचार आणि सूचना मंत्रालयाला शेअर करु शकता. आर्थिक मंत्रालयाने याबाबत शुक्रवारी एक ट्वीटही केले आहे.
Do you have ideas and suggestions that can become a part of Union Budget 2021-22? Here is an opportunity to share them.
Visit: https://t.co/qMDVQrsmB0@nsitharamanoffc @Anurag_Office @PIB_India @mygovindia @DDNewslive @airnewsalerts
— Ministry of Finance (@FinMinIndia) November 27, 2020
केंद्रीय बजेट बाबत तुम्ही तुमच्या सूचना mygov.in वेबसाइट वर जावून देवू शकता. आर्थिक मंत्रालयामध्ये आर्थिक बाबतीतला विभाग प्रत्येक वर्षी बजेट बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी आणि सामिल बनवण्यासाठी जनतेच्या सूचना आमंत्रित करत आहे. यावर्षीही, केंद्रीय बजेट साठी विभागाने सूचना आमंत्रित केल्या आहेत. आगामी संसद सत्रामध्ये सादर होणार्या बजेट च्या निर्माणामध्ये या सूचनांची अंमलबजावणी केली जावू शकते.