अबुजा : कोरोनामुळे जगातील मोठमोठे उद्योग आर्थिक संकटात अडकले आहेत. यामुळे कित्येक उद्योगांनी कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्या बरोबरच त्यांचे पगार कमी केले आहेत. पण नायजेरिया च्या सुन्ती गोल्डन शुगर एस्टेट्स (एसजीएसई) ने सांगितले की, त्यांनी आपल्या 2,400 कर्मचाऱ्यांना पूर्ण सावधानी बाळगून कामावर ठेवले आहे. श्रमिकांच्या सुरक्षेसाठी गोल्डन शुगर कंपनी च्या सहायक कंपनी SGSE ने , नाइजीरियाच्या पीएलसी (FMN) ची कारखाना सुरु ठेवला होता . समूहाचे कॉरपोरेट सर्विसेज चे निदेशक, जोसेफ उमोलू यांनी सांगितले की, कंपनीला स्थानिक साखर उत्पादनातील कमीमुळे आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तयार केले गेले होते.
जोसेफ उमेलू यांनी सांगितले की , कंपनीने गाळप हंगाम संपवला होता, ज्यामध्ये 146,200 टन ऊस तोड आणि 15,860 टन साखरेचे उत्पादन केले होते. कंपनीने इंधनाच्या रुपात बगॅस चा उपयोग करुन 9,640 टन मोलासिस आणि 11,600 मेगावॅट वीजेची निर्मिती केली. यावेळी जेव्हा COVID-19 लोकांच्या नोकरीच्या असुरक्षेचे कारण बनला आहे, सुन्ती ने ऊसाची शेती, सिंचन आणि उर्वरकासाठी आपल्या कर्मचाऱ्यांची ताकद जपली आहे. आमचे कर्मचारी, पुरवठादार, ग्राहक आणि हितचिंतकांच्या स्वास्थ्य आणि सुरक्षा यासाठी रणनीतिक उपाय केले आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.