लखनऊ: उत्तर प्रदेश सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुरवणी अर्थसंकल्पात अतिरिक्त निधीची तरतुद केली आहे. या अतिरिक्त निधीमुळे उत्तर प्रदेश सरकारने सहकारी साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देण्यासाठी कर्जाची व्यवस्था केली आहे. या माध्यमातून सरकार राज्यातील ऊस उत्पादन आणि साखर उत्पादनाला अधिक गती देण्याची तयारी करीत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांचे जीवन सुलभ बनविण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर, समृद्ध बनविण्याचा संकल्प केला आहे. राज्यामध्ये ४५.७४ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना २०१७-२०२१ या कालावधीत १,४०,००० कोटी रुपयांहून अधिक उच्चांकी ऊस बिले अदा करण्यात आली आहेत. यातून सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष असल्याचे दिसून आले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील युपी सरकारने अदा केलेली उसाची रक्कम यापूर्वीच्या बहुजन समाज पक्षाच्या सरकारच्या काळात दिलेल्या पैशांपेक्षा दुप्पट आणि समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळातील ऊस बिलांच्या दीडपट आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link