‘गोडसाखर’ला ऊस पाठवून सहकार्य करा : प्रा. कुराडे

कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना (गोडसाखर) जोमाने सुरू झाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्याला साथ द्यावी आणि आपला ऊस कारखान्याला पाठवावा, असे आवाहन प्रा. किसनराव कुराडे यांनी केले. कारखान्यातून साखर बाहेर पडल्यानंतर गौळदेवाला अर्पण करण्याची परंपरा आहे. या पूजनप्रसंगी ते बोलत होते.

प्रा. कुराडे म्हणाले की, कारखाना फायदेशीर पातळीवर आणण्याची जबाबदारी संचालकांबरोबर उत्पादकांवरही आलेली आहे. कारखाना क्षेत्रातील शेतकऱ्याने उसाचे एक कांडेदेखील बाहेरच्या कारखान्याला विकू नये. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत उचलून त्यांना इतर कारखान्यांइतकाच दर देण्याची हमी संचालकांनी द्यावी. संचालकांनी सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे. यावेळी कामगार संचालक शामराव हरळीकर, वाहन विभागप्रमुख संजय पाटील, संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुरेश कब्बुरी, कारखान्याचे सेक्रेटरी मानसिंगराव देसाई, संचालक सोमनाथ परीट, अजित पाटील, अनिल गायकवाड, आनंदा पाटील, राजीव खबाले, बसवराज आरबोळे, माजी संचालिका प्रा. क्रांती देवी कुराडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here