सांगली जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे सर्वेक्षण व आरोग्य तपासणी मोहीम

सांगली : सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुरांचे सर्वेक्षण व आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत कामेरी, शिवपुरी, विठ्ठलवाडी, तुजारपूर, येडेनिपाणी, गातारवाडी, वाघवाडी अशी गावे येतात. या गावांच्या परिसरात सध्या वारणा, यशवंतराव मोहिते (कृष्णा), राजारामबापू पाटील कारखान्यांच्या ऊसतोडी सुरू असून यासाठी जत, धुळे, कर्नाटक आदी परिसरातून मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत.

या टोळीतील वयोगट शून्य ते ५ वर्षांच्या बालकांची तपासणी, लस, गर्भवती माता तपासणी, बाहेरील भागातून आलेल्या या मजुरांचे मास सर्वेक्षण करून मलेरिया, डेंगू आदी साथीच्या आजारांची तपासणी केली जाते. ही तपासणी मोहीम कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राणोजी शिंदे, डॉ. नितीन चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका अर्चना देसाई, तृप्ती अवघडे, यश चव्हाण, आरोग्य सेविका काजल जानकर, सुवर्णा कुंभार, सुरेखा कांबळे, साधना आढाव आदी कर्मचारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here