सांगली : आरळा-करूंगली येथील दालमिया भारत शुगर युनिट निनाई साखर कारखान्यासमोर मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काटा बंद आंदोलन केले. एफआरपी अधिक १०० रुपये दर कारखान्याने द्यावा, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, कारखान्याने चालू गळीत हंगामात ३१०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. आता १६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत जो निर्णय होईल त्याप्रमाणे दर दिला जाणार असल्याची माहिती ‘दालमिया’ प्रशासनाने दिली.
दालमिया प्रशासनाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ५ डिसेंबरपर्यंत गाळप झालेल्या ऊसापोटी प्रती टन ३१०० रुपयांप्रमाणे बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहेत. स्वाभिमानीची मागणी पहिली उचल एफआरपी अधिक शंभर अशी आहे. त्यांच्या या मागणीचा विचार करू. मागील वर्षीच्या प्रशासनाने हंगामास ५० रुपये जादाची मागणी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेल्या बैठकीत होणारा निर्णय आम्हास मान्य राहील, असे पत्रात नमूद केले आहे. यावेळी भागवत जाधव, देवेंद्र धस, राम पाटील, मानसिंगराव पाटील, रविंद्र पाटील, शिवलिंग शेटे, प्रकाश पाटील, चंद्रकांत पाटील, सुरेश म्हामुटकर, देवानंद पाटील, मनिष पाटील आदी उपस्थित होते.