स्वभिमानी संघटनेचं ठरलं, 18 वी ऊस परिषद 23 नोव्हेंबरला

जयसिंगपूर : भारतातील 205 शेतकरी संघटना 17 देशातून शून्य टक्के कर आयात धोरणाला कडाडून विरोध करणार आहेत. या धोरणामुळे भारतीय शेतीमाल मातीमोल दराने विकावे लागणार आहे. चळवळीच्या अग्निकुंडासाठी ऊस परिषद काळाची गरज आहे. यााठी 23 नोव्हेंबरला जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर 18 वी ऊस परिषद घेण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी चळवळपणाला लावू, असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला.

शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांच्या नागरी सत्काराचे व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरुड मोर्शीचे मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमातच शेट्टी यांनी ऊस परिषदेची घोषणा केली.  यावेळी राजू शेट्टी यांनी शासनाच्या कृषी धोरणावर जोरदार टिका केली. ते म्हणाले, राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच नेते खुर्चीसाठी खटाटोप करीत आहेत. त्यांना राज्यातील शेतकर्‍याकडे पहायला वेळ नाही.

निवडणुकीत पराभव झाला असला तरी, शेतकर्‍यांसाठी चळवळ थांबवणार नाही. आमची ही 18 वी ऊस परिषद सरकारसाठी धोक्याची असणार आहे, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here