एफआरपीची रक्कम द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

कोल्हापूर : चीनी मंडी

साखरेचा किमान विक्री दर २९०० रुपयांवरून ३१०० रुपये झाला आहे. त्यामुळे बिद्री साखर कारखान्याने सभासद शेतकऱ्यांना त्वरीत एफआरपीची रक्कम द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या दालनात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला.

कारखान्याने उसाचा पहिला हप्ता २३०० रुपये सभासद शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केल्याची माहिती अध्यक्ष के. पी. पाटील यांनी दिली. तसेच साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये झाल्याने एफआरपीची उर्वरीत रक्कम ४८० रुपये प्रमाणे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करणार आहे, अशी माहिती अध्यक्ष पाटील यांनी दिली.

कारखान्याने एक रकमी एफआरपी द्यावी, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी गाळप केलेल्या व १६ डिसेंबरनंतर आलेल्या ३ लाख ६६ हजार टन उसाचे २३१ रुपये प्रमाणे ८ कोटी ४१ लाख रुपये थकीत आहेत. ही रक्कम कारखान्याकडेच ठेवून त्यावर शेतकऱ्यांना दहा टक्के व्याज देण्याचा कारखान्याचा मानस असल्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी सांगितले. पण, त्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी घ्यावी लागले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here