बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
कोल्हापूर : चीनी मंडी
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उर्वरीत एफआरपी साखरेच्या स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, उर्वरीत एफआरपीऐवजी साखर घेण्याची तयारी दर्शवली आहे. या संदर्भात संघटना लवकरच साखर कारखान्यांना लेखी पत्र देऊन साखर स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगणार आहे, अशी माहिती संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
राज्यात जानेवारी अखेर एफआरपीच्या थकबाकीने ४ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. साखर आयुक्तालयाकडून कारवाईचा बडगा उगारल्यानंतर राज्यातील विशेषतः सांगली-कोल्हापूर पट्ट्यातील साखर कारखानदारांनी उर्वरीत एफआरपी साखरेच्या स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला. या आठवड्याच्या सुरुवातीलाच हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या साखर कारखान्यांनी ८० टक्के एफआरपी जमा केली आहे. आता उर्वरीत एफआरपी साखरेच्या रुपाने ऊस उत्पादकांना देण्यात येणार आहे.
या संदर्भात खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘आम्ही साखर कारखान्यांच्या या प्रस्तावाला मान्यता देत आहोत. या संदर्भात आम्ही कारखान्यांना लेखी कळविणार आहोत. सध्याची किमान विक्री किंमत २९०० रुपये प्रति क्विंटल आहे. त्याच्या खालच्या दराने साखर विकण्यास आम्ही तयार आहोत.’
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp