कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने झाली . शेतकरी विरोधी निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा दहन करीत असताना पोलीस व आंदोलकांमध्ये वादावादी झाली. पोलीसांच्या भूमिकेचा जोरदार निषेध करण्यात आला.
शेतकऱ्यांचं अस म्हणणं आहे कि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मारक ठरतील असे अनेक कायदे केले आहेत. केंद्राच्या या धोरणांचा विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याची तयारी केली होती. मंगळवारी स्वाभिमानी कार्यकर्त्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. शेतकरीविरोधी कायदे मागे घ्याव्यात अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी केंद्र सरकारच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अडवले. यावेळी मोठ्ठा गोंधळ उडाला . कार्यकर्त्याकडून तो पुतळा जाळण्याचा प्रयत्न सुरू होताच पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न झाला. या गोंधळात माजी खासदार शेट्टी यांना धक्काबुक्की झाली. यामुळे गोंधळात आणखी भर पडल्याने तणाव निर्माण झाला होता.