शंकर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख कार्यकारी संचालक परिक्षेत उत्तीर्ण

सोलापूर : सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील शंकर सहकारी साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक स्वरूप दिलीपराव देशमुख हे कार्यकारी संचालक परिक्षेत उत्तीर्ण झाले. श्रीपूर येथील चंदशेखर विद्यालयात त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी शंकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रभारी कार्यकारी संचालक पदावर काम करण्याची संधी मिळाली.

कार्यकारी संचालकांची परीक्षा प्रथमच पूर्व, लेखी व मौखिक चाचणी अशा तीन टप्प्यामध्ये घेणेचा निर्णय करण्यात आला होता. यामध्ये पहिल्या टप्प्यातील चाळणी परीक्षा दि ५ एप्रिल २०२४ रोजी, दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षा दि ४ मे २०२४ रोजी व लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मौखिक चाचणी परीक्षा दि १९ जुलै ते २२ जुलै दरम्यान बैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थान, पुणे येथे घेण्यात आल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here