पाकिस्तान सरकारने देशात साखरेचा तुटवडा कमी करण्यासाठी १ मिलियन मेट्रिक टन साखर आयात करण्याची योजना तयार केली आहे.
पाकिस्तानच्या जियो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, सरकार पाकिस्तानी चलनात २२० रुपये (PKR) प्रती किलो या वाढत्या दराने साखर आयात करेल. आणि याचा बोजा जनतेवर पडणार आहे. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला नाईलाजाने आणखी पैसे भरावे लागणार आहेत.
सद्यस्थितीत साखर कारखानदारांनी देशांतर्गत वापरासाठी देशात ‘पुरेसा’ साखर साठा असल्याची ग्वाही देऊन निर्यात परवानगी मिळविण्यासाठी सरकारची दिशाभूल केल्याने ही स्थिती उद्भवली आहे. जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार, त्यामुळे आज एक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
अन्न विभागाकडून साखरेचा कॅरी ओव्हर अतिरिक्त साठा आहे. मात्र, विभागाच्या एका प्रवक्त्याने आगामी काही दिवसात संभाव्य साखर तुटवड्याच्या संकटाचा इशारा दिला आहे.
अधिकाऱ्यांकडे ही समस्या सोडविण्यासाठी साखरेचा अतिरिक्त साठा वापरणे हा एकमेव पर्याय आहे. मात्र, असा निर्णय झाल्यावर बाजारात आयात साखरेची विक्री केली जाईल. त्याचा भार ग्राहकांवर पडणार आहे.