उसाला ३५०० रुपये पहिली उचल द्यावी, यासाठी रयत क्रांती संघटनेचे लाक्षणिक उपोषण

लातूर : उसाला प्रति टन ३५०० रुपये पहिली उचल द्यावी, सोयाबीनला ६ हजार रुपये भाव द्यावा यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रयतक्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पेठे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

एफआरपीच्या नावाखाली कारखाने शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. साखरेच्या भावाच्या तुलनेत उसाचा दर कमी होत असून, शेतकऱ्यांना एक रक्कमी ३५०० रुपये पहिली उचल द्यावी, सोयाबीनला किमान ६ हजार रुपये हमी भाव देण्यात यावा, सोयाबीनवर १०० टक्के आयात शुल्क लावण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

आंदोलनात रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पेठे, जगदीश सुर्यवंशी, मधूकर जळकोटे, बालाजी सुर्यवंशी, रमेश मोहीते, अनिल शिंदे, महादेव कोरे, श्रीधर शिंदे, इंद्रजित माने, प्रल्हाद गड्डीमे, बालाजी आरीकर, आनंद लिंबापूरे, मच्छिद्र मुसणे, सिद्धेश्वर चाकुरे, शिवाजी माने, निखिल चव्हाण, माधव लिबापूरे, बबन माने, रामदास पेठे, उद्धव लिंबापुरे, प्रकाश माने, पंडीत शिंदे, तुकाराम काळे आदींसह तालुक्यातील शेतकरी मोठया संख्येने उपोषणात सहभागी झाले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here